मोठी बातमी! आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण, संजय गायकवाड यांना पहिला मोठा दणका!
मोठी बातमी समोर येत आहे, संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये असलेल्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती, आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. खराब जेवण दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती.